शिवसेनेला 'कोंबडी' पडणार महागात, पेटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस नेते नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. याबाबत निवडणूक आयोगाकडे पेटा तक्रार नोंदविणार आहे. त्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 16, 2015, 02:17 PM IST
शिवसेनेला 'कोंबडी' पडणार महागात, पेटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार title=

मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. याबाबत निवडणूक आयोगाकडे पेटा तक्रार नोंदविणार आहे. त्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

प्राण्यांना कोणतीही राजकीय मतं नसतात. कोंबड्या या पृथ्वीतलावरचा सर्वात शांत पक्षी आहे. असं असताना राजकीय उत्साह दाखवताना त्यांचे हाल कशाला असा सवाल पेटाने विचारला आहे. २०१२ मध्ये पेटाने केलेल्या पाठपुराव्यानंतर निवडणूक आय़ोगाने प्रचारादरम्यान प्राणी न वापरण्याचे निर्देश सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. तसंच या निर्देशांचं उल्लंघऩ करणा-या राजकीय पक्षांवर कारवाईचे संकेतही निवडणूक आय़ोगाने दिलेत. 

वांद्र्याच्या जनतेनं विकासाला नव्हे तर भावनेला कौल दिल्याची प्रतिक्रिया नारायण राणेंनी पराभवानंतर दिलीय. काँग्रेसच्या सर्वांनीच चांगली साथ दिली असल्याचं राणेंनी आवर्जून नमूद केलं. भविष्यात आपण काय करावं ते आपणच ठरवणार शिवसेनेनं आपल्याचा शिकवू नये, असा टोलाही राणेंनी लगावलाय. 

शिवसेनेनं आणि शिवसैनिकांनी जरा आगळं वेगळं सेलिब्रेशन केलं. राणेंचा पराभव झाल्यामुळे अरविंद भोसलेंसाठी चपला आणल्या तर राणेंना कोंबड्या दाखवल्या, शिवसैनिक इतक्यावरच थांबले नाही तर नारायण राणेंच्या जुहूच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. 

नारायण राणेंच्या वांद्र्यातल्या पराभवानंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रानं अपेक्षेप्रमाणे राणेंची खोडी काढली गेली. पहिल्या पानावर 'वाघाच्या पंजानं उंदीर चिरडला' अशी आठ कॉलम हेडलाईन आहे. कोंबड्या घेऊन जल्लोष करणाऱ्या शिवसैनिकांचा मोठा फोटोही छापण्यात आलाय.

सामनाच्या अग्रलेखामध्येही राणे, काँग्रेस आणि MIMवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसंच वांद्र्यात राणे जिंकतील असं भाकीत करणाऱ्यांचाही समाचार यात घेण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.