अच्छे दिन आ गये, पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खुश खबर... आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवे दर मध्य रात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. 

Updated: Oct 31, 2014, 08:01 PM IST
 अच्छे दिन आ गये, पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त  title=

मुंबई : वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खुश खबर... आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवे दर मध्य रात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.

पेट्रोलच्या दरात २ रुपये ४१ पैसे तर डिझेलच्या दरात २ रुपये २५ पैशांनी कपात करण्यात आली आहे. ही दर कपात झाल्यामुळे ऑगस्टनंतर पेट्रोलमध्ये सहाव्यांदा आणि डिझेलमध्ये दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी सरकारने डिझेलच्या दरात साडेतीन रुपयांनी कपात केली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.