नेस वाडियांच्या साक्षीदारांचा साक्ष देण्यास नकार

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा छेडछाड प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिझनेसमन नेस वाडिया याच्या दोन साक्षीदारांनी चौकशीमध्ये सहकार्य करण्यास नकार दिलाय. 

Updated: Jul 8, 2014, 01:59 PM IST
नेस वाडियांच्या साक्षीदारांचा साक्ष देण्यास नकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा छेडछाड प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिझनेसमन नेस वाडिया याच्या दोन साक्षीदारांनी चौकशीमध्ये सहकार्य करण्यास नकार दिलाय. तर उरलेल्या साक्षीदारांची अजून ओळखच पटलेली नाही किंवा त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. 

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा वाडियाच्या दोन साक्षीदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आपण वाडियानं दिलेल्या नावांच्या यादीतील ‘ते’ साक्षीदार आपण नसल्याचं म्हटलंय. परंतु, आमच्या (पोलिसांच्या) माहितीनुसार आम्ही वाडियानं दिलेल्या व्यक्तींशी संपर्क करण्यात कोणतीह चूक केलेली नाहीय’. 

महत्त्वाचं म्हणजे, नेस वाडियानं यानं दोन जुलै रोजी पोलिसांना पत्र लिहून प्रिती झिंटा हिनं आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी त्यानं नऊ साक्षीदारांची एक यादीच पोलिसांकडे दिली होती. परंतु, यामध्ये हे साक्षीदार काय काम करतात याचा उल्लेख मात्र नेसनं केला नव्हता.  या यादीमध्ये नेसनं, सेरिका लाल, लोरेट्टा जोसेफ, पूजा डडलानी, एन्नीलीन अॅडम्स, फराह उमरडम्स, फराह उमरभाई, स्वीटी बर्मन, कमलेश शाह, रयान मुस्तफा आणि शरत नाथ अशी नावं दिलेली होती.  

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘केवळ नावाच्या आधारावर या साक्षीदारांची ओळख पटवणं शक्य नाही. आम्ही आत्ताही या साक्षीदारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत’. 

अभिनेत्री प्रिती झिंटा हिनं नेस वाडियावर, 30 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान झालेल्या आयपीएल मॅच दरम्यान वाडियानं आपली छेडछाड केल्याचं तसंच शिव्या देणं आणि धमकी दिल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी आत्तापर्यंत प्रितीच्या 12 साक्षीदारांची साक्ष नोंदवलीय. यापैंकी सात साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची असल्याचं पोलिसांना वाटतंय. 

आत्तापर्यंत ज्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेलीय त्यामध्ये आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमन, बीसीसीआयचे सचिव संजय पटेल, किंग्ज इलेव्हन पंजाबचे सीओओ फ्रेजर कॅस्टेलिनो यांचा समावेश आहे. तसंच डेनिश मर्चंट, जय कन्नौजिया आणि पारुल खन्ना यांनी वादानंतर वाडियानं प्रितीला धक्काबुक्की केली तर कॅस्टेलिनो यांनी मात्र आपण कोणताही वाद किंवा धक्काबुक्की पाहिली नसल्याचं म्हटलंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.