आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा हिसका

एलबीटीविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेनं हिसका दाखवण्यास सुरुवात केलीय. मनसे कार्यकर्त्यांच्या संरक्षणात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं आता एलबीटीबाबत व्यापाऱ्यांची भूमिका मवाळ झाल्याचे संकेत मिळतायत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 12, 2013, 08:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एलबीटीविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेनं हिसका दाखवण्यास सुरुवात केलीय. मनसे कार्यकर्त्यांच्या संरक्षणात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं आता एलबीटीबाबत व्यापाऱ्यांची भूमिका मवाळ झाल्याचे संकेत मिळतायत.
गेल्या काही दिवसांपासून एलबीटीला विरोध करण्यासाठी शटरबंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकानं उघडलीत. एलबीटीविरोधात पुकारलेल्या बंदमधून या व्यापाऱ्यांनी माघार घेतलीय आणि मनसे कार्यकर्ते या व्यापाऱ्यांना संरक्षण देतायत. सुरुवातीला एलबीटीच्या मुद्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्यापाऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. मात्र आंदोलन करत असताना सामान्यांना वेठीस धरु नका असं आवाहनही त्यांनी केलं.
मात्र तरीही व्यापाऱ्यांचं आंदोलन सुरु राहिलं आणि नागरिकांचे हाल झाले. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांनी एलबीटीला विरोध करणारी याचिका फेटाळली. त्यामुळं आता एलबीटीला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मनसे रस्त्यावर उतरलीय.

दादरमध्ये व्यापा-यांनी दुकानं उघडण्याची तयारी दाखवली असली तरी दक्षिण मुंबईत मात्र व्यापा-यांचं आंदोलन सुरुच आहे.एकीकडे व्यापा-यांचा विरोध तर दुसरीकडे मनसेनं आक्रमक भूमिका घेत व्यापा-यांना संरक्षण दिलंय. त्यामुळं आता इतर व्यापारी काय भूमिका घेतात याकडं सा-याचं लक्ष लागलंय.
एलबीटीला विरोध करत मुंबईत आंदोलन करणाऱ्या व्यापारी संघटनात फूट पडलीय. एलबीटीच्या बंदमधून किरकोळ व्यापाऱ्यांनी माघार घेतलीय. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतलाय.
किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी झी मीडियाशी बोलताना ही माहिती दिलीय.
एलबीटी मुंबई लागू नसतानाही आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दाखवली असतानाही व्यापा-यांनी एलबीटीविरोधात बंद पुकारला होता... या बंदमुळं सामान्य मुंबईकरांचे हाल झाले. मात्र आता अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा किरकोळ व्यापारी संघटनेच्या वीरेन शहा यांनी केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.