राज ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बंद खोलीत गुप्त चर्चा

By Prashant Jadhav | Last Updated: Sunday, September 15, 2013 - 00:09

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. बंद खोलीत सुमारे पाऊण तास त्यांची चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय.
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केलेली टीका आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ही भेट झाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय. दरम्यान, राज ठाकरे यांनी मराठी भाषीक तरुणांनाच टँक्सी परवाने मिळावेत, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
नऊ हजार टँक्सी परवाने आहेत. ते सर्व मराठी भाषिक तरुणांनाच मिळावेत अशी मागणी आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरीष्ठ अधिका-यांशी विचारविनमय करुन योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. राज ठाकरे यांच्या बरोबर आमदार प्रवीण दरेकर हेसुद्धा उपस्थित होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 14, 2013 - 23:29
comments powered by Disqus