भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे

भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांची निवड झाली आहे. दानवे यांनी पुन्हा एकदा भाजपची सुत्रे स्विकारली आहेत. 

Updated: Jan 18, 2016, 11:14 PM IST
भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे title=

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांची निवड झाली आहे. दानवे यांनी पुन्हा एकदा भाजपची सुत्रे स्विकारली आहेत. 

राज्यात भाजरची सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली तर रिक्त झालेल्या या पदासाठी दानवे यांची निवड झाली होती. आज त्यांची पूर्णकालीन अध्यक्षपदावर नियुक्‍ती करण्यात आली. 

रावसाहेब दानवे हे जालन्याचे खासदार असून ४ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. राज्यात भाजपचा मराठा समाजाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. 

भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहे. राज्यात पक्षासाठी अनेक चांगली काम करुन त्यांनी पक्षश्रेष्टींकडून वाहवाह मिळवली.