राज्यातील रस्ते सुधारण्यासाठी कंत्राटाच्या नियमात बदल

राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधरवण्यासाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा वाहतुकीवर परिणाम होतोच पण त्याचा फटका अर्थव्यवस्थेवरही पडतो. तेव्हा रस्त्यांचा दर्जा सुधरवण्याबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. 

Updated: Aug 10, 2015, 06:32 PM IST
राज्यातील रस्ते सुधारण्यासाठी कंत्राटाच्या नियमात बदल title=

मुंबई : राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधरवण्यासाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा वाहतुकीवर परिणाम होतोच पण त्याचा फटका अर्थव्यवस्थेवरही पडतो. तेव्हा रस्त्यांचा दर्जा सुधरवण्याबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. 

राज्यात सध्या 90, 532 किमी लांबीच्या रस्त्यांचे जाळे आहे. यापैकी 24,300 किमीचे रस्ते चांगला वापर असलेले म्हणून ओळखले जातात. तर सुमारे 25,000 किमीचे रस्ते हे, दर्जा बरा म्हणून ओळखले जातात. तर सुमार दर्जाचे म्हणून तब्बल ४४ हजार किलोमीटरचे रस्ते राज्यात आहेत. 

या दर्जाचा रस्ता सुधरवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. यासाठी रस्त्यांची जवाबदारी कंत्राटदारांना देतांना नियमात मुलभुत बदल करण्यात येणार आहेत. यामुळे पुढील काही वर्ष रस्त्याची जवाबदारी कंत्राटदरावर राहील आणि अटीचे पालन न झाल्यास पर्यायी कारवाई करण्याबाबत सरकार विचार करत आहे. 

तसेच यापुढे रस्ता सुधारण्याचे कंत्राट देतांना दुतर्फा झाडे लावणे अनिर्वाय करणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.