भाजप-शिवसेना युतीसाठी आता सरसंघचालकांचे प्रयत्न- सूत्र

सेना-भाजप युतीसाठी आता सरसंघचालक मोहन भागवतांनी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. युती बाबत शिवसेना आणि मोहन भागवतांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं. 

Updated: Nov 16, 2014, 12:06 PM IST
भाजप-शिवसेना युतीसाठी आता सरसंघचालकांचे प्रयत्न- सूत्र title=

मुंबई: सेना-भाजप युतीसाठी आता सरसंघचालक मोहन भागवतांनी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. युती बाबत शिवसेना आणि मोहन भागवतांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं. 

भाजपनं सरकार स्थापनेसाठी घेतलेल्या राष्ट्रावादीच्या पाठिंब्यामुळं भाजपातील एक गट नाराज झालाय त्यामुळं शिवसेनेला माफ करण्यासाठी भाजपवर दबाव वाढू लागलाय.

दरम्यान, काल मराठवाड्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यांवर गेलेल्या अमित शाह यांनीही शिवसेना भाजप मधील चर्चा विश्वासदर्शक ठरावानंतर पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलंय. तर राष्ट्रवादीवरच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर द्यायचं टाळलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.