शक्ती मिल गँगरेप : एका गुन्ह्यात दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

शक्ती मिल कम्पाऊंड बलात्काराच्या दोन प्रकरणांमधील एका प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिलाय. यामध्ये, सलीम अन्सारी, विजय जाधव, अश्फाक शेख, कासीम शेख या चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 21, 2014, 02:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शक्ती मिल कम्पाऊंड बलात्काराच्या दोन प्रकरणांमधील एका प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिलाय. यामध्ये, सलीम अन्सारी, विजय जाधव, अश्फाक शेख, कासीम शेख या चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. टेलिफोन ऑपरेटर महिलेवर केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात न्यायालयानं हा निर्णय दिलाय. तर फोटो जर्नालिस्ट बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायालयानं २४ मार्चपर्यंत निकाल राखून ठेवलाय.
मुंबईतल्या शक्ती मिल बलात्कार खटल्यात गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयानं चार आरोपींना दोषी ठरवलं होतं. आज या चारही आरोपींना शिक्षा ठोठावलीय. हे सर्व दोषी कमी वयाचे असून त्यांच्या घरातील एकमेव कमावते आहेत. त्यामुळे या आरोपींना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी दोषींच्या वकिलांनी केली होती.
महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात गेल्या वर्षी ३१ जुलै २०१३ रोजी टेलिफोन ऑपरेटरवर तर २२ ऑगस्ट २०१३ ला एका फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील विजय जाधव, मोहम्मद कासिम शेख उर्फ कासिम बंगाली, सिराज रहमान, सलीम अन्सारी आणि अश्फाक या चारही जणांना पोलिसांनी सखोल तपासानंतर अटक केली होती. गुन्हेगारी कारस्थान, बलात्कार, अनैसर्गिक शारीरिक संबंध, डांबून ठेवणे, पुरावे नष्ट करणे असे आरोप ठेवण्यात आलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.