शीना हत्या प्रकरण: कार सापडली, तीनही आरोपींना घटनास्थळी नेणार पोलीस

शीना बोरा गूढ हत्या प्रकरणात पोलिसांना शनिवारी त्या कारचा शोध लागला, ज्यात शीनाची हत्या केली गेली. तर दुसरीकडे रायगड पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी शीनाच्या अवशेषांवरून हत्या किंवा अपघाताचा गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न निर्माण झालाय. 

PTI | Updated: Aug 30, 2015, 10:48 AM IST
शीना हत्या प्रकरण: कार सापडली, तीनही आरोपींना घटनास्थळी नेणार पोलीस title=

मुंबई: शीना बोरा गूढ हत्या प्रकरणात पोलिसांना शनिवारी त्या कारचा शोध लागला, ज्यात शीनाची हत्या केली गेली. तर दुसरीकडे रायगड पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी शीनाच्या अवशेषांवरून हत्या किंवा अपघाताचा गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न निर्माण झालाय. 

आणखी वाचा - शीना बोराचा भाऊ मिखाईल स्वतःच अडचणीत

मुंबई पोलीस आज याप्रकरणी तीनही आरोपींना  घटनास्थळी नेणार आहेत. जिथं एप्रिल २०१२मध्ये शीनाच्या हत्येनंतर एक महिन्याने मृतदेह सापडला होता.

इंद्राणीचा मुलगा मिखाइलची एका हॉटेलमध्ये चौकशी केली गेलीय. पोलिसांनी सांगितलं इंद्राणी आणि खन्नाने प्रश्नांची उत्तर नीट दिली नाही.  एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आम्हाला कारचा शोध लागलाय. तीन वर्षांमध्ये अनेक जणांनी ही कार वापरली अजून ती हस्तगत केली गेली नाही.' पोलीस आरोपींना घटनास्थळी नेऊन तेव्हाची परिस्थिती निर्माण करणार आहे. त्यांचे तेव्हाचे कॉल रेकॉर्डही मागवण्यात आलेत. 

आणखी वाचा - इंद्राणीनं नाही तर भाऊ मिखाईलनं धाडला होता राजीनाम्याचा 'ई-मेल'!

रायगड पोलिसांना तीन वर्षांपूर्वी २३ मे २०१२ला जळालेल्या अवस्थेत शीनाचा मृतदेह सापडला होता, एका प्रत्यक्षदर्शीनं मृतदेह पाहून पोलिसांना कळवलं होतं. ओळख केल्यानंतर तत्कालीन पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यांनी सांगितलं अवशेष जेजे हॉस्पिटलला पाठवले तेव्हा पोलिस स्टेशनच्या डायरीत नोंद केली गेली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.