शिवसैनिकांनी शाई फेकली, सुधींद्र कुलकर्णींचा आरोप

सुधींद्र कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली आहे, ही शाई शिवसैनिकांनी फेकल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.

Updated: Oct 12, 2015, 10:35 AM IST
शिवसैनिकांनी शाई फेकली, सुधींद्र कुलकर्णींचा आरोप title=

मुंबई : सुधींद्र कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली आहे, ही शाई शिवसैनिकांनी फेकल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.

मुंबईत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या ‘नायदर अ हॉक नॉर अ डोव्ह’ पुस्तकाचं प्रकाशन आज नेहरू सेंटरला आहे. या घटनेनंतर नेहरू सेंटरला छावणीचं स्वरूप आलं आहे.

शाई फेकल्यानंतर स्वत: कुलकर्णी यांनी हा फोटो ट्वीटरवर अपलोड केला आहे. घराकडून ऑफिसकडे जात असतांना शिवसैनिकांनी आपल्यावर शाई फेकल्याचा दावा सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.

सुधींद्र कुलकर्णी अध्यक्ष असलेल्या ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने, पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रीय मंत्र्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत ठेवलंय, या कार्यक्रमाला शिवसेनेने तीव्र विरोध आहे, त्या आधीच ही शाई फेकल्याची घटना समोर आली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी डांबर की शाई हे माहित नाही, तसेच शाई कुणी फेकली?, याची माहिती घेणार असल्याचं म्हटलं आहे. जनतेत संताप आहे, आणि ही सुरूवातीला सौम्य प्रतिक्रिया आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.