मुंबई : शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधी भूमिकेचा फटका आज बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांना बसलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरियार खान आज मनोहर यांच्या भेटीला मुंबईत आहेत.
या विरोधात आज दक्षिण मुंबईतल्या शिवसैनिकांनी आज बीसीसीआयच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून निषेध केला. शशांक मनोहर यांच्या कार्यालयात जवळपास शंभर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर शिवसैनिकांनीच दिलेल्या माहितीनुसार शहरियार खान यांच्याशी होणारी बैठक मनोहर यांनी रद्द केलीय. पण बैठक रद्द झाल्याच्या बातमीला बीसीसीआयनं कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिलेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.