सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला यंदाही हवंय 'शिवाजी पार्क'

शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष... यानिमित्तानं शिवसेनेला पुन्हा एकदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर सभा घेण्याची इच्छा आहे.

Updated: Oct 15, 2015, 01:11 PM IST
सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला यंदाही हवंय 'शिवाजी पार्क' title=

मुंबई : शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष... यानिमित्तानं शिवसेनेला पुन्हा एकदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर सभा घेण्याची इच्छा आहे.

यासाठी शिवसेनाला 'सायलेन्स झोन' म्हणून घोषित करण्यात आलेल्या शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महापालिका विभागीय कार्यालयात सादर केला मागणी अर्ज दाखल केलाय. 

महापालिका नियम 37 A अंतर्गत परवानगी देण्याची विनंती यात करण्यात आलीय. राज्य सरकारनं सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 45 दिवस राखून ठेवलेत, त्या अंतर्गत परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहे. 

यासाठी, उच्च न्यायालयात याचिका सादर करण्याची तयारीदेखील शिवसेनेनं तयारी दाखवलीय.  

शिवाजी पार्कवर जाहीर सभेसहीत दसरा मेळाव्याची सेनेची गेल्या अनेक वर्षांची परंपरा राहिलीय. परंतु, शिवाजी पार्क न्यायालयाने शांतता क्षेत्र घोषित केल्यानं या दसरा मेळाव्याला दरवर्षी खो मिळतोय. गेली तीन वर्षे न्यायालयानं आवाजाची मर्यादा नेमून शिवसेनेला सशर्त परवानगी दिली होती. 

उल्लेखनीय म्हणजे, शिवसेनेकडून प्रत्येक वेळी आवाजच्या मर्यादेच उल्लंघन झालं... आणि दसरा मेळावा आयोजकांना पोलिसांनी आर्थिक दंडही ठोठावला. 

दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शक्तिप्रदर्शनाची तयारीदेखील शिवसेनेकडून सुरू आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.