मुंबईकरांसाठी खुशखबर! ३१ डिसेंबरला ‘मरे’, ‘परे’च्या विशेष लोकल

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचं स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेनं आठ तर मध्य रेल्वेनं चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 31, 2014, 08:43 AM IST
मुंबईकरांसाठी खुशखबर! ३१ डिसेंबरला ‘मरे’, ‘परे’च्या विशेष लोकल title=

मुंबई : ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचं स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेनं आठ तर मध्य रेल्वेनं चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकल चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट अशा बारा डब्यांच्या धावतील. चर्चगेटहून मध्यरात्री १.१५ वा., १.५५ वा., २.२५ वा., ३.२० वा. ट्रेन सोडण्यात येईल. त्यानंतर विरारहून विशेष ट्रेन ००.१५ वाजता, ००.४५ वा., १.४० वाजता आणि २.५५ वा. सोडण्यात येणार असल्याचे परेकडून सांगण्यात आले. या सर्व लोकल धीम्या असतील.

तर मध्य रेल्वेनंही चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटीहून कल्याणसाठी मध्यरात्री दीड वाजता लोकल सुटून कल्याणला तीन वाजता पोहोचेल. तर सीएसटीहून पनवेलसाठी याच वेळेनुसार लोकल सोडली जाईल आणि ही लोकल पनवेल इथं मध्यरात्री २.५० वाजता पोहोचेल. तसंच कल्याणहून मध्यरात्री दीड वाजता लोकल सुटून सीएसटी इथं तीन वाजता पोहोचेल. तर पनवेलहून याच वेळेत लोकल सोडून सीएसटी इथं २.५० वाजता पोहोचेल, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.