मुंबई : भारतात सुपर रिच लोकांची संख्या २ हजार ८० वर पोहोचली आहे. या लोकांची एकूण संपत्ती ५० मिलियन डॉलरपेक्षाही अधिक आहे. ही माहिती क्रेडिट सुइस ग्लोबल वेल्थ रिपोर्टमधून समोर आली आहे.
रिपोर्टमध्ये लिहण्यात आलं आहे, भारतात लखपती लोकांची संख्या ६५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशात ही संख्या १ लाख ८५ हजार वाढून ३ लाखच्या वर जाण्यााची शक्यता आहे.
असमानता चिंताजनक
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय, भारत वेगाने श्रीमंत वाढत असले, तरी आर्थिक असमानता हा देशातील खरा चिंतेचा विषय आहे. देशात ९५ टक्के लोकसंख्येकडे पाच,दहा हजार डॉलरपेक्षाही कमी संपत्ती आहे.
लोकसंख्येच्या 0.3 लोकांकडे एकूण १ लाख डॉलरपेक्षा अधिक संपत्ती आहे. मात्र एक दिलासा दायक बाब अशी देखील आहे की, देशातील मध्यमवर्गीय लोकांची संपत्ती मागील पंधरा वर्षात १५० टक्के वाढली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.