सुप्रिया सुळेंनी घेतली भुजबळांची भेट

मनी लॉन्ड्रिंग आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली आहे. 

Updated: Mar 19, 2016, 02:42 PM IST
सुप्रिया सुळेंनी घेतली भुजबळांची भेट title=

मुंबई: मनी लॉन्ड्रिंग आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली आहे. 

आर्थर रोड तुरुंगामध्ये जाऊन सुप्रिया सुळेंनी भुजबळांची भेट घेतली. पण यानंतर त्यांनी माध्यमांना भुजबळांविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. भुजबळांविषयी प्रश्न विचारला असता हॅप्पी होली असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या.

आम्हा सगळ्यांना तुरुंगात डांबले तरी आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाहीत. आम्ही मराठे आहोत; कधीच डगमगत नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी भुजबळांच्या अटकेनंतर दिली होती. पण आता मात्र त्यांनी याविषयी बोलणं टाळलं आहे.

छगन भुजबळ यांना 31 मार्च पर्यंत न्यायालयिन कोठडी देण्यात आली आहे, तर त्यांचा पुतण्या समिर भुजबळ हेही अटकेत आहेत. इडीकडून या दोघांची चौकशी सुरु आहे.