#टॅक्सीलूट कायम: एलटीटीवर चाकूच्या धाकावर प्रवाशाला लुटलं

मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस बाहेर दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून, एका टॅक्सी चालकानं प्रवाशाला लुटलं. कुर्ला रेल्वे पोलिसांनी या आरोपी टॅक्सी चालकाला अटक केलीय. 

Updated: Apr 19, 2015, 10:41 PM IST
#टॅक्सीलूट कायम: एलटीटीवर चाकूच्या धाकावर प्रवाशाला लुटलं title=

मुंबई: मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस बाहेर दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून, एका टॅक्सी चालकानं प्रवाशाला लुटलं. कुर्ला रेल्वे पोलिसांनी या आरोपी टॅक्सी चालकाला अटक केलीय. 

उत्तर प्रदेशातल्या जौनपूर इथून ४६ वर्षांचे तनवीर हसन, असद अब्बास आणि जायेद अब्बास या दोघा मुलांसह कुर्ला इथल्या लोकमान्य टिळक टर्मिनसला उतरले. त्यांना दक्षिण मुंबईतल्या ग्रँट रोड इथल्या नातेवाइकाकडे जायचं होतं. बाबू कांबळे या टॅक्सीचालकानं त्यांना अडीचशे रुपयांत सोडण्याचं सांगत, आपल्या टॅक्सीत बसवलं. मात्र पुढे चेंबूर सांताक्रुज रोडवर टॅक्सी थांबवून बाबू कांबळेनं तनवीर हसन यांच्याकडून, चाकूच्या धाकावर सहा हजार रुपये लुटून पोबारा केला. 

झाल्या घटनेची तक्रार तनवीर यांनी नोंदवल्यानंतर, रेल्वे पोलिसांनी आरोपी बाबू कांबळेला अटक केली. दरम्यान झाल्या प्रकारानं तनवीर आणि त्यांची मुलं पुरती घाबरुन गेली. 

पोलिसांनी या प्रकरणी बाबू कांबळेवर लुटमारीचा गुन्हा दाखल केलाय. पण या घटनेनं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.