मुंबईत घातपाताची शक्यता; सावधानतेचा इशारा

गेल्या दोन आठवड्यांत विविध कारागृहातून पलायन केलेल्या अतिरेक्यांकडून मुंबईत घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती मिळतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 5, 2013, 06:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या दोन आठवड्यांत विविध कारागृहातून पलायन केलेल्या अतिरेक्यांकडून मुंबईत घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळेच या उत्सवाच्या काळात प्रत्येकाने सतर्कता बाळगणं गरजेचं आहे, असा इशारा गुप्तहेर संस्थेनं दिलाय.
मुंबईसह देशभरात नवरात्रौत्सवाला जल्लोषात सुरुवात झालीय. मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिरातही नवरात्रौत्सवाला उत्साहाने सुरुवात झालीय. भक्त मोठ्या संख्येनं मातेचं दर्शन करण्यासाठी मंदिरात दाखल होतायत. भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आलीय.

परंतु गेल्या दोन आठवड्यांत वेगवेगळ्या तुरुंगातून तब्बल सात दहशतवाद्यांनी पलायन केलंय. हेच लपून बसलेले अतिरेकी मुंबईत सणासुदीच्या काळात घातपात घडवून आणण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तवली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close