माजी महापौर शुभा राऊळांवर नाराज दहिसरवासी

१० वर्ष चांगल्या कामासाठी ओळखणल्या जाणाऱ्या राउळ यांचा दहिसरमध्ये दबदबा आहे. यावेळी मात्र त्यांच्या वास्तव्याचा मुख्य मुद्दा करुन विरोध त्यांना अडचणीत आणण्याच्या प्रय़त्नात आहेत.

Updated: Dec 7, 2011, 07:06 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

निवडणूक आली की नेत्यांना जनतेची आठवण होते. तसाच प्रकार माजी महापौर शुभा राऊळ यांच्याबाबत झालाय. दहिसरमधून निवडून आलेल्या राऊळ दादरमध्ये राहतात.गरजेच्यावेळी नगरसेविका उपलब्ध नसतात असा त्यांच्या वॉर्डातल्या मतदारांचा आरोप आहे. राऊळ यांना मात्र हा आरोप मान्य नाही.

 

माजी महापौर शुभा राउळ दहिसर पश्चिम विभागातून २ वेळा नगरसेवक झाल्या, महापौरही झाल्या. महापौरपदाच्या कार्यकाळात दादरला महापौर बंगल्यात राहिला आल्या आणि नंतरहीदादरमध्येच स्थायिक झाल्या. आता निवडणूक जवळ आल्यानंत्यांच्यादहिसरमध्येभेटीगाठी वाढल्यात. दहिसरमधले नागरिक मात्र नगरसेविका गरजेच्यावेळी मदतीला नसतात असा आक्षेप घेत आहेत.

 

१० वर्ष चांगल्या कामासाठी ओळखणल्या जाणाऱ्या राउळ यांचा दहिसरमध्ये दबदबा आहे. यावेळी मात्र त्यांच्या वास्तव्याचा मुख्य मुद्दा करुन विरोध त्यांना अडचणीत आणण्याच्या प्रय़त्नात आहेत.

राऊळ यांनी दहा वर्षांच्या कारकिर्दीत बागा, दहिसर नदीवरील पूल, संरक्षण भिंतीचं काम अशी कामं केल्याचं सांगताहेत. दहिसर नदीच्या संरक्षण भिंतीचं काम मात्रपूर्ण झालेलं नाही. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांत पाणी शिरतं. अनेक चाळींमध्येपुरेसं पाणीय़ेत नाही.नगरसेविका वार्डात राहत नसल्यानं स्थानिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं हा आक्षेप राऊळ यांना मान्य नाही.