सासूच्या हत्येनंतर सुनेची आत्महत्या

सासूच्या हत्येनंतर सुनेची आत्महत्या

सासूची हत्या करुन सुनेनं स्वत:च जीवन संपवल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडलीये. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये.

दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला

दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला झाला आहे. या तरूणीच्या मानेला दुखापत झाली आहे, तिच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत, पुजा बाळकृष्ण पाखरे असं या पीडीत तरूणीचं नाव आहे.

दादरमधल्या महापालिकेच्या मराठी शाळेत एकही विद्यार्थी नाही दादरमधल्या महापालिकेच्या मराठी शाळेत एकही विद्यार्थी नाही

दादर मराठी बाणा असलेलं मराठी माणसांचा ठिकाण, पण ऐकून आश्चर्य वाटेल दादरमधील पालिकेच्या मराठी शाळेत आज एकही विद्यार्थी नाही.

 दादरमध्ये मुलाने केली आईची हत्या दादरमध्ये मुलाने केली आईची हत्या

मुंबईच्या दादरमध्ये एका वृद्ध महिलेची तिच्याच मुलानं अमानुषपणे हत्या केली. मुलानं आपल्या आईच्या डोक्यात धोपाटणं मारत तिची हत्या केली. 

धावत्या लोकलमध्ये चढताना व्यक्तीचा मृत्यू धावत्या लोकलमध्ये चढताना व्यक्तीचा मृत्यू

धावत्या एक्सप्रेसमधून उतरताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दादरच्या प्लॅटफॉर्मवर अशीच एक घटना घडलीये. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय. 

महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला महासागर महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला महासागर

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांचा महासागर लोटला आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत. 

दादर येथे इमारतीला भीषण आग, २ जण गंभीर दादर येथे इमारतीला भीषण आग, २ जण गंभीर

दादर पश्चिमेकडील फूलमार्केट परिसरातील अमर-उमर या इमारतीला आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत २ जण गंभीर जखमी झालेत तर ३० ते ३५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

दादर - सावंतवाडी विशेष रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार दादर - सावंतवाडी विशेष रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. दिवाळीसाठी ही खास गाडी असणार आहे. ही गाडी रविवारपासून धावेल. या गाडीचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले आहे.

दादरचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनससाठी हालचाली दादरचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनससाठी हालचाली

मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्टेशन परळ. या स्टेशनचा विस्तार करुन टर्मिनस उभारण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, हालचाली होत नव्हत्या. आता परळ टर्मिनससाठी हालचाली सुरु झाल्यात. याबाबत निविदा १५ दिवसांत खुल्या होणार आहेत, अशी माहिती पुढे येत आहे.

दादरच्या एकाही रहिवाशाला घर सोडावं लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन दादरच्या एकाही रहिवाशाला घर सोडावं लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मेट्रो 3 प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि सुभाष देसाई यांनी आज शिष्टमंडळासह 

प्रकल्पासाठी दादरकरांना हात लावू देणार नाही - राज ठाकरे प्रकल्पासाठी दादरकरांना हात लावू देणार नाही - राज ठाकरे

दादरमधील मेट्रो वादावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये आता चांगलीच स्पर्धा रंगताना दिसतेय. शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं असताना तर दुसरीकडे प्रकल्पबाधित दादरकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहचलं. या भेटीनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेसह युती सरकारवर टीकेची झोड उठवलीय. 

मेट्रो-३ आणि दादारकरांच्या बैठकीत तोडगा नाहीच मेट्रो-३ आणि दादारकरांच्या बैठकीत तोडगा नाहीच

मेट्रो-३ स्टेशनसाठी दादरकरांना बजावण्यात आलेल्या नोटीस प्रकरणी मुंबईत महापौर बंगल्यावर आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रहिवाशांच्या पश्नावर कुठलाही तोडगा निघालेला नाही पण, गोंधळ मात्र नक्की झाला. 

दादरमधील चाळींवर मेट्रो-३चे संकट, एमआरडीएची नोटीस दादरमधील चाळींवर मेट्रो-३चे संकट, एमआरडीएची नोटीस

गिरगावमधलं मेट्रो ३ चं वादळ आता दादरमध्ये सरकलंय. मेट्रो प्रकल्पासाठी तुमची जागा द्या, अशी नोटीस एमएमआरसीएनं दादरमधील रहिवाशांना दिली आहे. त्यामुळे दादरकर चिंतेत आहेत. मनसेनं याप्रकरणी दादरवासियांच्या पाठिशी उभं राहाण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, सत्तेत असताना तुम्ही विरोध करत आहेत, हे तुमचं अपयश आहे, असा थेट आरोप मनसेनेने केलाय.

मेट्रोसाठी आता दादरच्या रहिवाश्यांना नोटीसा मेट्रोसाठी आता दादरच्या रहिवाश्यांना नोटीसा

गिरगाव वासियांपाठोपाठ आता दादरकरांवर देखील मेट्रो रेल्वेची संक्रांत आलीय. 

'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला! 'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!

म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.

कोकणवासियांसाठी खुशखबर : दादर - सावंतवाडी विशेष गाडी कोकणवासियांसाठी खुशखबर : दादर - सावंतवाडी विशेष गाडी

कोकणवासियांसाठी एक खुशखबर आहे... दादर - सावंतवाडी ०१०९५  ही विशेष गाडी २७ मार्च पासून दर मंगळवार, शुक्रवार आणी रविवार सावंतवाडीकडे रवाना होणार आहे.

दादर येथील आगीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलाचे नुकसान दादर येथील आगीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलाचे नुकसान

दादरमध्ये कबुतरखान्याजवळ टायटन शो रुमला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलयाची अनेक पुस्तकं जळून खाक झालीत. दरम्यान, भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडली, पण क्रीडा भवनाची? बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडली, पण क्रीडा भवनाची?

अखेर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडल्याचं दिसतंय. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरच्या वीर सावरकर मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महापालिकेचं हे क्रीडा भवन नादुरूस्त असल्याचं कारण देत दोनच दिवसांपूर्वी बंद करण्यात आलंय. 

माहिममध्ये मनसे शिवसेनेत चुरशीची लढत माहिममध्ये मनसे शिवसेनेत चुरशीची लढत

माहिम मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय. मनसे आणि शिवसेना दोन्ही उमेदवारांमध्ये याठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. मनसेनं पुन्हा एकदा नितिन सरदेसाई यांना संधी दिलीय. तर शिवसेनेनं सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवलंय. 

दादरमधील 'वायफाय'वरुन शिवसेना-मनसे-पालिकेत 'हायफाय' दादरमधील 'वायफाय'वरुन शिवसेना-मनसे-पालिकेत 'हायफाय'

दादरमध्ये वायफाय सुविधा देण्यावरुन वाद पेटला आहे. पालिका अधिकारी आणि मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात चांगलीच जुंपलीय. 

प्रवाशांसाठी रेल्वे कॅन्टीन ठरतायत `फायर बॉम्ब`!

सोमवारी दादरच्या पश्चिम रेल्वे दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन नंबरवरच्या कॅन्टीनमध्ये आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवांनाची चांगलीच दमछाक झाली.