मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश फॉर्मवर आता ‘तिसरा’ कॉलम!

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश अर्जावर आता तृतीय पंथीयांना आपलं जेंडर नोंदवण्यासाठी ‘तिसरा’ कॉलम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही तृतीयपंथीय विद्यार्थ्याला ‘इतर’ या कॉलमध्ये आपली नोंद करता येणार आहे. 

Updated: Apr 22, 2015, 12:41 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश फॉर्मवर आता ‘तिसरा’ कॉलम! title=

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश अर्जावर आता तृतीय पंथीयांना आपलं जेंडर नोंदवण्यासाठी ‘तिसरा’ कॉलम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही तृतीयपंथीय विद्यार्थ्याला ‘इतर’ या कॉलमध्ये आपली नोंद करता येणार आहे. 

तृतीय पंथीयांना शिक्षण घेताना शालेय स्तरापासूनच ‘विचित्र’ नजरांचा त्रास सहन करावा लागतो. यावर मात करून काही विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याचाही प्रयत्न करतात. मात्र तिथंही त्यांना अवहेलनांचा सामना करावा लागतो. विद्यापीठाच्या प्रवेश अर्जावरही विद्यार्थ्यांना स्त्री आणि पुरुष असे दोन कॉलम असतात. यामुळे प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागतो. 

मुंबई विद्यापीठाने मात्र आता अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रवेश अर्जावरच ‘स्त्री’, ‘पुरुष’ या बरोबरच ‘इतर’ अशा कॉलमचा समावेश करण्यात येणार आहे. 
तृतीयपंथी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जावर आपल्या जेंडरची नोंद करण्याची सोय उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.