राज्यातील ८० टोलनाक्यांवर छोट्या कारला टोलमाफी?

राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार टोलमुक्तीच्या दिशेने उद्या पहिले पाऊल टाकण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले राज्यातील 80 टोल नाक्यांवर लहान चार चाकी वाहनांना टोलमाफी करण्याची घोषणा उद्या होण्याची दाट शक्यता आहे. 

Updated: Apr 9, 2015, 05:35 PM IST
राज्यातील ८० टोलनाक्यांवर छोट्या कारला टोलमाफी? title=

दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार टोलमुक्तीच्या दिशेने उद्या पहिले पाऊल टाकण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले राज्यातील 80 टोल नाक्यांवर लहान चार चाकी वाहनांना टोलमाफी करण्याची घोषणा उद्या होण्याची दाट शक्यता आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची सर्व प्रक्रिया सरकारने पूर्ण केली असून उद्या मुख्यमंत्री विधानसभेत याबाबतची घोषणा करणार आहेत. ट्रेक, टेम्पो, ट्रेलर यासारख्या मोठ्या वाहनांना मात्र टोल कायम असणार आहे.

लहान वाहनांना टोल माफी देताना मोठ्या वाहनांवर जादा टोल आकारणी, टोल वसुलीचा कालवधी वाढवणे, सरकारकडून कंत्राटदाराला एकरकमी परतफेड असे पर्याय सरकारसमोर आहेत. 

टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर टोलही बंद केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.