टोलच्या दरात वाढ, मुंबई प्रवेश करणे महागले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल आंदोलन करत टोल  भरणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर राज्यात टोलफोड आंदोलन झाले. त्यानंतर राज्य सरकारने जवळपास ३० टोल बंद केले. असे असताना आता पुन्हा टोल दरात ५ रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Updated: Sep 24, 2014, 11:03 AM IST
टोलच्या दरात वाढ, मुंबई प्रवेश करणे महागले title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल आंदोलन करत टोल  भरणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर राज्यात टोलफोड आंदोलन झाले. त्यानंतर राज्य सरकारने जवळपास ३० टोल बंद केले. असे असताना आता पुन्हा टोल दरात ५ रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबईत खासगी वाहनाने ये-जा करणाऱ्यांना आता १ ऑक्टोबरपासून वाढीव टोलचा भरुदड सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात करारानुसार वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार कारचालकांना ३०ऐवजी ३५ रुपये टोलपोटी मोजावे लागतील, तर अवजड वाहनांसाठी ही वाढ १५  ते २० रुपयांची असेल.

मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि एलबीएस मार्ग या मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोलनाके उभारण्यात आले. राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात तीन वर्षांनी वाढ होते. सप्टेंबर २००२ मध्ये दर तीन वर्षांनी अशा रीतीने टोलच्या दरात वाढ होईल याबाबतची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार दर तीन वर्षांनी मुंबईच्या टोलदरात वाढ होते. त्यानुसार आता १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ होत आहे.

मोटार कार ३० ऐवजी ३५ रुपये, हलकी वाहने ४० रुपयांऐवजी ४५ तर बस, ट्रक, ट्रेलर आदींसाठी ७५ रुपयांवरुन ९० रुपये तसेच अवजड वाहनांसाठी ९५ रुपयांवरुन ११५ रुपये अशी दरवाढ होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.