त्यांना देशभक्ती नव्याने शिकवावी लागेल, मोदींना उद्धव यांचा टोला

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भ्रष्टाचार हा परकीय भूमीवर जाऊन हशा, टाळ्या मिळवण्याचा विषय नाही. परदेशात जाऊन देशाविषयी बरं बोलायला हवं, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलंय.

Updated: Jun 8, 2016, 05:18 PM IST
त्यांना देशभक्ती नव्याने शिकवावी लागेल, मोदींना उद्धव यांचा टोला title=

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भ्रष्टाचार हा परकीय भूमीवर जाऊन हशा, टाळ्या मिळवण्याचा विषय नाही. परदेशात जाऊन देशाविषयी बरं बोलायला हवं, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलंय.

स्वदेशातील यंत्रणेवर झोड उठवून देश-विदेशात यथेच्छ बदनामी करून जे लोक हशा व टाळ्या मिळवत आहेत त्यांना देशभक्तीचे धडे नव्याने द्यावे लागतील, अशा तिखट शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं आहे. 

पाच राष्ट्रांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच स्वित्झर्लंडला भेट दिली. तिथे केलेल्या  आमच्या देशात क्रिकेट, सिनेमा आणि भ्रष्टाचारावरच बोललं जातं, असं मोदी म्हणाले होते. त्यावर आमच्या देशाची बाहेर जाऊन बदनामी करू नका, अशी तिखट प्रतिक्रिया उद्धव यांनी दिलीय.