उद्धव ठाकरेंनी आमदार, मंत्र्याना पाजले बाळकडू

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना बाळकडू पाजले. काम जमत नसेल तर राजीनामा द्या, असे स्पष्ट बजावले.

Updated: Mar 4, 2015, 06:32 PM IST
उद्धव ठाकरेंनी आमदार, मंत्र्याना पाजले बाळकडू title=
छाया - डीएनए

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना बाळकडू पाजले. काम जमत नसेल तर राजीनामा द्या, असे स्पष्ट बजावले.

भविष्यात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा मंत्र त्यांनी रंगशारदा सभागृहात झालेल्या बैठकीत उद्दव ठाकरे यांनी दिला. अधिकार असो वा नसो, जनतेच्या हिताची कामे करत राहा. दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी झटत राहा, अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिल्या.

दरम्यान, भूसंपान विधेयकावरून भाजप-शिवसेनेत वाद कायम आहेत. सत्तेत राहून विरोध अयोग्य असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शिवसेनेवर केलीय. तर शिवसेनेचा  भूसंपादनाला नव्हे तर त्यातल्या जाचक अटींना विरोध असल्याचं प्रत्त्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलंय.

शिवसेनेला विधेयकाला आंधळा विरोध नाही आणि आंधळा पाठिंबाही  नसल्याचं उद्धव ठाकरेंनी नमूद केलंय. विधेयकातल्या जाचकतेबाबत पंतप्रधानांना पत्र देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.