मुंबई: 'विको' उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गजानन पेंढारकर यांचं प्रदीर्घ आजारानं आज निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. परळमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून पेंढारकर यांची प्रकृती खालावली होती.
अहमदाबादमध्ये त्यांनी फार्मसीची पदवी घेतली. नंतर १९५७मध्ये वडिलांच्या व्यवसायात सहभागी होत गजानन पेंढारकर यांनी 'विको'च्या माध्यमातून आयुर्वेदाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.
सुरूवातील परळ इथं १२०० चौरस फुटाच्या जागेत 'विको'ची उत्पादनं तयार व्हायची. नंतर डोंबिवलीत पेंढारकरांनी कारखाना सुरू केला आपला व्यवसाय वाढवला. गोवा, नागपूर, डोंबिवलीमध्ये त्यांच्या कंपन्यांचा विस्तार आहे. हर्बल टूथपेस्ट, टूथपावडर, टर्मरिक स्कीन क्रीम, हर्बल शेव्हिंग क्रीम, आयुर्वेदिक पेन रिलीफ यासारख्या वैविध्यपूर्ण उत्पादनांची मालिका विकोनं ग्राहकांसाठी आणली होती.
पेंढारकर यांच्यासारख्या प्रयोगशील उद्योगपतीच्या निधनामुळं उद्योग क्षेत्रात हळळहळ व्यक्त होत आहे. तब्बल ४५ वर्षांपासून विको म्हणजेच विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनीची धुरा संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे सांभाळली होती. विकोची आयुर्वेदिक उत्पादनं जागतिक स्तरावर नेऊन पेंढारकरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वेगळा ठसा उमटवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.