शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द

पाकिस्तानी कलाकार गझलकार गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने तीव्र विरोध केल्यानंतर मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. आयोजकांनी गुलाम अलींचा कार्यक्रम होणार नसल्याचे सांगितलेय.

Updated: Oct 7, 2015, 09:39 PM IST
शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द title=
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुलाम अली (संग्रहित, छाया - पीटीआय)

मुंबई : पाकिस्तानी कलाकार गझलकार गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने तीव्र विरोध केल्यानंतर मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. आयोजकांनी गुलाम अलींचा कार्यक्रम होणार नसल्याचे सांगितलेय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महापौर बंगल्यावर आयोजक यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी आयोजकांनी माघार घेतली. गुलाम अलींच्या कार्यक्रम होणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेने पाकिस्तान कलाकारांबाबत तीव्र विरोध केला. पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या षण्मुखानंदमध्ये कार्यक्रम होणार होता. याला शिवसेनेने विरोध केला होता. गुलाम अलींचा ९ ऑक्टोबरला होणारा कार्यक्रम रद्द करा अन्यथा शिवसेना स्टाईल निषेध करु, अशी धमकीच शिवसेनेने दिली होती. चित्रपट सेनेने या संदर्भातील पत्र आयोजक आणि षण्मुखानंद हॉलमध्ये दिले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.