पाहा विक्रोळीतील चोरीचं हे सीसीटीव्ही फुटेज

आता आम्ही तुम्हाला एका चोरीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवणार आहोत. ही घटना घडलीय विक्रोळीतल्या एका दागिन्याच्या दुकानात. विक्रोळी मधील स्वर्ण पॅलेस या दुकानात एका चोरट्यानं १ लाखांचे दागिने हातोहात लंपास केले. 

Updated: Jul 8, 2015, 11:14 PM IST
पाहा विक्रोळीतील चोरीचं हे सीसीटीव्ही फुटेज title=

मुंबई: आता आम्ही तुम्हाला एका चोरीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवणार आहोत. ही घटना घडलीय विक्रोळीतल्या एका दागिन्याच्या दुकानात. विक्रोळी मधील स्वर्ण पॅलेस या दुकानात एका चोरट्यानं १ लाखांचे दागिने हातोहात लंपास केले. 

हा चोरटा दुकानात ग्राहक म्हणून आला होता. या चोरीचा सर्व प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हातातील ब्रेसलेट घेण्याच्या बहाण्यानं त्यानं या सोनाराला आपल्या विश्वासात घेतलं आणि इतर दागिने काढण्यासाठी या सोनाराची पाठ वळताच या चोरट्यानं दोन ब्रेसलेट घेऊन पळ काढला. या घटनेचा विक्रोली पोलीस तपास करत आहेत.

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.