Hardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?

Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.

सुरभि जगदीश | Updated: May 7, 2024, 07:30 AM IST
Hardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं? title=

Hardik Pandya: सोमवारी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 7 विकेट्सने मुंबईचा विजय झाला. यंदाच्या आयपीएलमधील मुंबईचा हा चौथा विजय होता. या विजयासह मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये एक स्थान पुढे आलीये. यावेळी मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.

काय म्हणाला Hardik Pandya?

सनराझर्स हैदराबादच्या सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये हार्दिक पांड्या म्हणाला की, मी स्थिती पाहतो आणि त्यानुसार गोलंदाजी करतो. “आम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचं होतं, पण मला वाटतं की आम्ही 10-15 अतिरिक्त रन्स दिले. आमच्या खेळाडूंची फलंदाजी उत्कृष्ट होती. मला योग्य क्षेत्रामध्ये गोलंदाजी करायला आवडते.

आज मी भेदक गोलंदाजी केली आणि ती कामी आली. गोलंदाजांना अजून चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या त्यांच्याकडून होणाऱ्या चुका कमी झाल्या आहे. सूर्यकुमार यादवची फलंदाजी अविश्वसनीय होती. SKY ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो गोलंदाजांना दडपणाखाली ठेवतो. त्याच्या फलंदाजीची शैली बदलली आहे. तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. संपूर्ण सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे, असंही हार्दिक पंड्या म्हणाला. 

मुंबईचा हैदराबादवर विजय

पीयूष चावलाची भेदक गोलंदाजी आणि सूर्याची तळपती खेळी यामुळे अखेर मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 17 व्या सिझनमधील चौथा विजय मिळवला आहे. सलग चार पराभव स्विकारल्यानंतर वानखेडेच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादला 7 विकेट्सने पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना हैदाराबादच्या टीमने 173 रन्स केले. यावेळी हेडचे 48 रन्स आणि कमिन्सच्या 35 रन्सच्या खेळीसह 173 रन्स केले. यावेळी मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि पियुष चावलाने सर्वाधिक 3-3 विकेट्स घेतल्या.

दुसरीकडे या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा आणि इशान किशन स्वस्तात माघारी परतले. तर नमन धीर एकही रन न करता माघारी परतला. मात्र एकटा सूर्याच हैदराबादच्या संघावर भारी पडला. यावेळी 51 बॉल्समध्ये सूर्याने दमदार शतकी खेळी केली आणि मुंबईला विजय मिळवून दिला.