विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मुख्यमंत्र्यांनी केली बरखास्त

 पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्यात आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

Updated: Jun 12, 2015, 11:17 AM IST
विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मुख्यमंत्र्यांनी केली बरखास्त title=

मुंबई : पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्यात आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा डांगे हे सध्या मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्या जागी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

गेल्या अडीच वर्षांपासून चर्चेत असलेली पंढरपूरची श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती मुख्यमंत्र्यांनी बरखास्त केली. समितीचे सदस्य वसंत पाटील यांच्यासह विविध वारकरी संघटना, राजकीय पक्षांनी सदरची समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती. नवनियुक्त समिती गठीत होईपर्यंत समितीचा कारभार आता जिल्हाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.