पाळीव कुत्रा 'बॉन्ड' राज ठाकरेंच्या पत्नीला का चावला?

महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नीवर त्यांच्याच पाळीव कुत्र्यानं हल्ला केला. बॉन्डनं शर्मिला ठाकरे यांना एवढं गंभीर चावलं की, शर्मिला ठाकरेंना तब्बल ६५ टाके पडलेत. 

Updated: Aug 20, 2015, 07:34 PM IST
पाळीव कुत्रा 'बॉन्ड' राज ठाकरेंच्या पत्नीला का चावला?   title=

मुंबई: महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नीवर त्यांच्याच पाळीव कुत्र्यानं हल्ला केला. बॉन्डनं शर्मिला ठाकरे यांना एवढं गंभीर चावलं की, शर्मिला ठाकरेंना तब्बल ६५ टाके पडलेत. 

मुंबईतील डॉक्टर जे. सी. खन्ना यांच्यानुसार कुत्रा जर प्रजननापासून दूर राहिला असेल तर तो अधिक हिंसक होतो. डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितलं की, जर कुत्र्याचा मालक जर कुणाचा जास्त लाड करत असेल तर तो अशा पद्धतीनं हिंसक होतो. डॉक्टरांच्या मते असंही होऊ शकतं की, राज ठाकरेंचा कुत्रा बॉन्ड अचानक हिंसक झाला आणि त्यानं शर्मिला ठाकरेंना चावा घेतला.

शर्मिला ठाकरेंवर या हल्ल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्लास्टिक सर्जरी करावी लागलीय. या घटनेनंतर राज ठाकरेंनी आपल्याकडील सर्व कुत्र्यांना कर्जतच्या फार्म हाऊसवर पाठवलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.