कोळसा घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन

कोळसा खाण घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. कोळसा खाण घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी सीबीआयन आता धाडसत्र हाती घेतलंय. त्यात नागपूरात चार ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकलेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 23, 2012, 08:06 AM IST

अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूर
कोळसा खाण घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. कोळसा खाण घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी सीबीआयन आता धाडसत्र हाती घेतलंय. त्यात नागपूरात चार ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकलेत.
कोळसा खाण घोटाळाप्रकरणी शनिवारी सीबीआयने आणखी सात ठिकाणी छापे घातले आहेत. नागपूरात चार ठिकाणी तसंच चंद्रपूर आणि पश्चिम बंगालमधल्या आसनसोल इथं हे छापे टाकण्यात आले. नागपूरात मुकेश गुप्ता या उद्योजकाच्या कार्यालयांत आणि निवासस्थानी सीबीआयच्या अधिका-यांनी कसून तपासणी केलीये. गुप्ता कोल या कोळसा उद्योगातल्या कंपनीचे ते मालक आहेत.
नागपूरातल्याच विकास आणि ग्रेस इंडस्ट्रीजदेखील कारवाईच्या कचाट्याच सापडल्याने एकच खळबळ उडालीयं. दुसरीकडे खाण घोटाळ्यांबाबत आठवड्यागणिक बॉम्बगोळा टाकणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपण लवकरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच नागपूर कनेक्शन उघड करणार असल्याचं म्हटलंय.
एकूणच खाण घोटाळाप्रकरणी सीबीआयनं नव्यानं दोन एफआयआरही दाखल केलेत. सीबीआयच्या या चौकशीतून काय बाहेर येतंय, हेही लवकरच स्पष्ट होईल. मात्र किरीट सोमय्या आता आणखी कोणता बॉम्बगोळा टाकणार याचीही साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.