...अरेरे राज्यातील लोडशेडिंग आणखी वाढणार

दुष्काळाने पिचलेला महाराष्ट्र आता लोडशेडिंगमुळे भरडून निघणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ७ संचापैकी ४ संच बंद पडले आहेत.

Updated: Aug 20, 2012, 05:13 PM IST

www.24taas.com, चंद्रपूर
दुष्काळाने पिचलेला महाराष्ट्र आता लोडशेडिंगमुळे भरडून निघणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ७ संचापैकी ४ संच बंद पडले आहेत. त्यामुळे चंद्रपूर केंद्रातून वीजनिर्मिती घटली आहे.
चार संच बंद पडल्यामुळे रत्नागिरी, मुंबई उपनगर,गुजरात आणि गोव्यावर परिणाम जाणवणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या २३४० मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेपैकी केवळ ५४० मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे.
७ संचांपैकी ३ आणि ६ क्रमांकाचे संच वार्षिक देखभालीसाठी बंद आहेत तर चौथ्या आणि पाचव्या टर्बाईनमध्ये ओला कोळसा अडकल्यामुळे ते संच बंद आहेत. चार संच बंद पडल्यामुळे राज्यात लोडशेडिंग वाढण्याची शक्यता आहे.