भारतीय महिला टीमचा ‘सुवर्णवेध’!

पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं शानदार कामगिरी करत सांघिक रिकर्व या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलंय. कोरियांच्या संघावर २१९-२१५नं मात केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 26, 2013, 01:09 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, पोलंड
पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं शानदार कामगिरी करत सांघिक रिकर्व या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलंय. कोरियांच्या संघावर २१९-२१५नं मात केली.
दीपिकाकुमारी लाशिराम, बोंबायलादेवी आणि रिमिल बुरूली यांच्या भारतीय संघानं सुवर्णवेध साधलाय. विषेश म्हणजे कोरियाची टीम या सुवर्णपदाकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र असं असतांना भारताच्या मुलींनी कोरियाशी ‘काटें की टक्कर’ देत अवघ्या 4 गुणांनी सुवर्णवेध केला आणि भारतीय गोटात एकच जल्लोष झाला.
विश्वचषक मालिकेतलं महिला तिरंदाजी संघाचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलंय. यापूर्वी मागच्याच महिन्यात कोलंबियात झालेल्या स्पर्धेतही भारतीय संघानं सुवर्णवेध साधला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.