आजपासून `आयबीएल`ची टशन सुरू!

इंडियन प्रीमियर लीग अर्थाच आयपीएलच्या धर्तीवर इंडियन बॅडमिंटन लीगला आजापासून उत्साहात प्रारंभ होणार आहे. सायना नेहवाल विरुद्ध पी. व्ही. सिंधू असा मुकाबलाही या टूर्नामेन्टमध्ये रंगणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 14, 2013, 09:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंडियन प्रीमियर लीग अर्थाच `आयपीएल`च्या धर्तीवर इंडियन बॅडमिंटन लीगला आजापासून उत्साहात प्रारंभ होणार आहे. सायना नेहवाल विरुद्ध पी. व्ही. सिंधू असा मुकाबलाही या टूर्नामेन्टमध्ये रंगणार आहे. त्यामुळे बॅडमिंटनप्रेमींना भारतीय बॅडमिंटनपटूंबरोबरच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंचा खेळ पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.
पहिल्या वहिल्या इंडियन बॅडमिंटन लीगचीच चर्चा जोरदार सुरु आहे. सुपरहिट ठरलेला आयपीएलचा फॉर्म्युला वापरून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आयबीएल’मध्ये राष्ट्रीय प्लेअर्ससोबतच परदेशी बॅडमिंटन प्लेअर्सच्या खेळाची मजाही बॅडमिंटन प्रेमींना अनुभवता येणार आहे. १४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या ‘आयबीएल’च्या या पहिल्या सीझनमध्ये सहा टीम्स सहभागी होणार असून प्रत्येक टीममध्ये सहभागी असणारे ११ प्लेअर्स लीगमध्ये मिळणाऱ्या एकूण १० लाख डॉलर्स रकमेच्या बक्षिसाकरता आपापसांत भिडणार आहेत.

भारतात क्रिकेटेतर खेळांना प्राधान्य मिळण्याकरता ‘आयबीएल’च्या रूपात उचलण्यात येणारी पावलं कौतुकास्पद अशीच म्हणावी लागतील. १९ आणि २० ऑगस्टला मुंबईकरांसाठी बॅडमिंटनची मेजवानीच ठरणार आहे. याशिवाय ३१ ऑगस्टला ‘आयबीएल’ची पहिली विजेती टीम ही मुंबईतच ठरणार आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप, ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यासांरख्या अनेक बॅडमिंटनपटूंच्या खेळाची ट्रीट क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंच्या खेळाची मेजवानीही बॅडमिंटनप्रेमींना मिळणार आहे. आता पुढचा पंधरा दिवस क्रिकेटवेड्या भारतावर बॅडमिंटन फिव्हर चढणार, असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.