लंडन ऑलिम्पिक - सुपर सायना सेमीत

वर्ल्ड क्रमांक चार असलेल्या भारताच्या सायना नेहवालने झंझावाती खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

Updated: Aug 3, 2012, 06:50 PM IST

www.24taas.com, लंडन

वर्ल्ड क्रमांक चार असलेल्या भारताच्या सायना नेहवालने झंझावाती खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री सव्वा आठ वाजता संपलेल्या या सामन्यात सायनाने डेन्मार्कच्या टिना बाऊन हिचा २१-१५, २२-२० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट सायनाने १६ मिनिटांत जिंकला तर दुसरा गेम २१ मिनिटांत आपल्या ताब्यात घेतला.

सेमी फायनलमध्ये सायनाची लढत वर्ल्ड नंबर १ इहान वँगशी असणार आहे. त्यामुळे सायनाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सायनाने हा सामना जिंकल्यावर सायनाचे पदक निश्चित होणार आहे.