मायकल शूमाकरची प्रकृती गंभीर

फॉर्म्युला- वन वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शूमाकरची प्रकृती खूपच गंभीर झाल्याचं समजतंय. उपचारादरम्यान गंभीर चूक झाल्याचं फॉर्म्युला-वनचे माजी डॉक्टर यांनी सांगितलंय.

Updated: Mar 27, 2014, 05:17 PM IST

www.zee24taas.com, वृत्तसंस्था
फॉर्म्युला- वन वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शूमाकरची प्रकृती खूपच गंभीर झाल्याचं समजतंय. उपचारादरम्यान गंभीर चूक झाल्याचं फॉर्म्युला-वनचे माजी डॉक्टर यांनी सांगितलंय.
सूत्रांनुसार, स्किईंग करतांना झालेल्या अपघातात जखमी झालेल्या शूमाकरवर उपचार करण्यास जास्त वेळ लागतोय. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणाही कमी होतेय. गॅरी हार्टस्टीन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की, `सुरुवातीच्या उपचारामध्ये झालेल्या गंभीर चुकांमुळे मायकलची प्रकृती अजून ढासळण्याची शक्यता आहे.`
मात्र त्यानंतर हार्टस्टीन यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं की, मायकल जिथंउपचार घेत आहे मी त्या हॉस्पिटलबद्दलनाही बोललो, तर हॉस्पिटललानेण्याआधीच्या उपचारांबद्दलबोललो. पॅरिसमध्ये स्किईंग करतांना शूमाकरचा हा अपघात झाला. जखमी झाल्यानंतर शूमाकरकोमात गेलाय.
फॉर्म्युला वन करिअरमध्ये शूमाकरनं रेकॉर्डब्रेक ९१ रेसेस जिंकल्या आहेत. ४४ वर्षीय शुमाकरनं २००६मध्ये निवृत्ती घेतेल्यानंतर पुन्हा रेस ट्रॅकवर कमबॅक केलं होतं. मात्र, त्याचं कमबॅक फारसं यशस्वी झालं नाही आणि त्यानं २०१२ मध्ये पुन्हा फॉर्म्युला वनला अलविदा केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.