शनिशिंगणापूर : चौथाऱ्यावर जाऊन पूजेचा भूमाता संघटनेचा प्रयत्न...पण

भूमाता ब्रिगेडच्या महिला आंदोलकांना रोखलं.

Updated: Jan 26, 2016, 06:28 PM IST
शनिशिंगणापूर : चौथाऱ्यावर जाऊन पूजेचा भूमाता संघटनेचा प्रयत्न...पण title=

अहमदनगर : भूमाता ब्रिगेडच्या महिला आंदोलक शिरूरवरून शनी शिंगणापूरसाठी रवाना झाल्या. शिंगणापूरमध्ये महिलांनी शनिदेवाच्या चौथ-यावर जाऊन पूजा करणं निषिद्ध आहे. मात्र शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या चौथ-यावर जाऊन पूजा करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडनं दिल्यानं सध्या एकच खळबळ उडाली.

आंदोलनकांना अडवण्यासाठी शिरुर पोलिसांनी नाकाबंदी केली. जवळपास दोन तास पोलिसांनी त्यांना तिथं थांबवून ठेवलं. आपल्याला पुढे जाऊ दिलं नाही, तर आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येईल, असं आंदोलक महिलांनी त्यावेळी सांगितलं.

भूमाता ब्रिगेडच्या महिलांना पोलिसांनी अडवलं 

पुणे-नगर रस्त्यावर सुपे जवळ पोलिसांनी आता पुन्हा या महिला आंदोलकांना आडवून धरलं आहे. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये राडा झाला. आंदोलकांना आडवून धरल्याने भूमाता ब्रिगेडनं ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.