‘चिंटू’कार प्रभाकर वाडेकर यांचे निधन

महाराष्ट्राच्या `चिंटू` या चित्रकथेने घराघऱात पोहचणारे `चिंटू`चे लेखक प्रभाकर वाडेकर यांचे पुण्यात शनिवारी निधन झाले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 15, 2013, 04:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महाराष्ट्राच्या `चिंटू` या चित्रकथेने घराघऱात पोहचणारे `चिंटू`चे लेखक प्रभाकर वाडेकर यांचे पुण्यात शनिवारी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात ब्रेन हॅमरेजमुळे वाडेकर यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी साडे सहा वाजता वैकुंठमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्या्त येणार आहे.
`चिंटू`चा पहिला अंक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी `सकाळ वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून `चिंटू`ने अनेक आबालवृद्धांचा लाडका बनला होता. काही वर्षे ही चित्रकथा `लोकसत्ता`मधूनही प्रसिद्ध होत होती.
‘चिंटू’ चित्रकथा मालिकेनंतर नुकतेच ‘चिंटू’वर दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे प्रभाकर वाडेकर यांचा चिंटू आबालवृद्धांचा आणखी लाडका झाला होता.
प्रभाकर वाडेकर यांच्या अकाली निधनामुळे `चिंटू`चे व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.