पुणे स्टेशनवर सर्वत्र घाणीचं साम्राज्य

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणा-या आणि जाणाऱ्या 160 ट्रेन...त्यातून दररोज एक लाख प्रवाशांची ये-जा... हेरिटेज दर्जा लाभलेली मुख्य इमारत...अशा पुणे स्टेशनवर सध्या सफाई कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. मात्र प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. तर रेल्वे प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 13, 2012, 09:20 PM IST

www.24taas.com, पुणे
देशाच्या कानाकोपऱ्यातून येणा-या आणि जाणाऱ्या 160 ट्रेन...त्यातून दररोज एक लाख प्रवाशांची ये-जा... हेरिटेज दर्जा लाभलेली मुख्य इमारत...अशा पुणे स्टेशनवर सध्या सफाई कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. मात्र प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. तर रेल्वे प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतली आहे.
पुणे स्टेशनवर कचरा पेट्या भरल्या असल्यामुळे स्टेशनवर जागोजागी असा कचरा साठलाय. स्वच्छता गृहाची स्थिती तर विचारूच नका... रेल्वे ट्रॅकवरील दुर्गंधीमुळे तर प्रवाशांना नाक मुठीत घेऊनच वावरावं लागतंय. कंत्राटी सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे स्टेशनची अशी अवस्था झाली आहे. तीन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यामुळे इथल्या कामगरांचं आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनाची दखल ना ठेकेदारानं घेतली... ना रेल्वे प्रशासनानं...मात्र त्यामुळे प्रवाशांचं आरोग्य मात्र धोक्यात आलंय.
रेल्वेनं हा वाद मिटवून किमान प्रवाशांसाठी तरी स्टेशन साफ ठेवणं आवश्यक झालंय. नसता हे आंदोलन चिघळल्यास प्रवाशांना स्टेशनवर पाय ठेवणंही अवघड होईल.