कोल्हापुरात नगरसेवकांच्या अटकेनंतर तणाव

टोलवसुली विरोधात कोल्हापुरात पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कोल्हापुरात शिरोळ नाक्यावर आंदोलन करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Feb 5, 2014, 02:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
टोलवसुली विरोधात कोल्हापुरात पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कोल्हापुरात शिरोळ नाक्यावर आंदोलन करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे.
टोलवसुलीविरोधात सर्व पक्षीय नगरसेवकांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तसेच सर्व पक्षीय नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.
टोल वसुली सुरू झाल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी राजीनामा दिला आणि नगरसेवकांना अटक झाल्यामुळे कोल्हापुरात सध्या तणावाचं वातावरण आहे. महापौरांना लाठीमार केल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे.
कोल्हापुरात आज आयआरबीने अचानक टोलवसुली सुरू केली आहे. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी टोल नाक्यावर आंदोलन केल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे.
कोल्हापुरात टोल वसुलीचं प्रकरण आणखी गाजण्याची चिन्हं यावरून दिसून येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.