राज ठाकरे कोणावर साधणार निशाणा...

Last Updated: Friday, February 15, 2013 - 17:54

www.24taas.com, खेड
आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दुसरी जाहीर सभा आहे. आजच्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांनी कोल्हापुरच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करीत त्यांच्यावर टीका केली. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवारांनी राज ठाकरेंवर तुफान हल्ला चढवला. ‘नकला करून लोकांचं मनोरंजन होतं, विकासाची कामं होतं नसतात’, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना चांगलेच खडे बोल सुनावले, नाशिकमध्ये बोलत असताना अजित पवारांनी नाशिकची काय अवस्था करून ठेवली आहे? आमचं पिंपरी-चिंचवड येऊन बघा, कसं चमकतयं, असे बोलत नाशिकच्या विकासात्मक कामावरही टीका केली.
त्यामुळे आता या सगळ्या टीकांचा राज ठाकरे कसा समाचार घेणार याकडेच साऱ्यांचा लक्ष लागून राहिलं आहे. राज ठाकरे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा आहे. त्यात राज ठाकरे कोणकोणत्या विषयांना हात घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवारांच्या टीकेला राज प्रत्युत्तर देणार का? तसेच जाधवांघरच्या शाही लग्न सोहळ्यावर काय बोलणार? अनेक नेते लग्न कार्यावर बेसुमार पैसा खर्च करतात. त्यामुळे आता ह्या लग्न सोहळ्याबाबत राज ठाकरे काय बोलणार?

तसेच कोकणातीस औष्णिक प्रकल्प असणाऱ्या जैतापूर ऊर्जा प्रकल्पावरील त्यांच्या भूमिकेवर राज ठाकरे हे ठाम राहणार का? कोकणातील औष्णिक प्रकल्प, खाण उद्योगांवर काय भूमिका घेणार? कोकण रेल्वेतील परप्रातियांच्या स्टॉल्सवर राज काय बोलणार? यासारख्या अनेक प्रश्नावर राज ठाकरेंची भुमिका काय असणार... हे आजच्या सभेत स्पष्ट होईलचं...

First Published: Friday, February 15, 2013 - 17:43
comments powered by Disqus