पवार काका-पुतण्यांच्या पाठीशी राणे- Y.P. सिंग

लवासा घोटाळ्याबाबत केजरीवाल यांना टार्गेट करीत वाय. पी. सिंग यांनी पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्याचसोबत त्यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही आरोप केले.

Updated: Oct 18, 2012, 07:43 PM IST

www.24taas.com, मुंबई
लवासा घोटाळ्याबाबत केजरीवाल यांना टार्गेट करीत वाय. पी. सिंग यांनी पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्याचसोबत त्यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही आरोप केले. जलसिंचनमंत्री असताना अजित पवार यांनी लवासा प्रकल्पाला ३४८ एकर जमिन कवडीमोल किमतीने दिली. तर महसूल मंत्री असताना हे प्रकरण नारायण राणे यांनी योग्यरितीने दडपले. त्यामुळे नारायण राणे हे पवारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते.
या साऱ्या गोष्टींचे सर्व पुरावे असताना अरविंद केजरीवाल यांनी पवार कुटुंबियांचे मुद्दाम नाव घेतले नाही, असा आरोप माजी आयपीएस अधिकारी व टीम अण्णाचे माजी सदस्य वाय. पी. सिंग यांनी केला. महाराष्ट्रात माजी आयपीएस अधिकारी राहिलेले व सध्या वकिलीसह सामाजिक चळवळीशी संबंधित सिंग यांनी सांगितले की, सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्याविरोधात भरपूर पुरावे असतानाही केजरीवाल यांनी खुलासा केला नाही.
अजित पवारांनी मंत्रीपदाचा वापर करुन जलसिंचन विभागाची ३४८ एकर जमीन केवळ २३ हजार रुपये प्रति महिना भाडेतत्त्वावर ३० वर्षासाठी दिली आहे. या जमिनीचा लिलाव का करण्यात आला नाही, असा माझा सवाल आहे. लवासा लेक सिटीत शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे व जावई सदानंद सुळे यांचे लाखो रुपयांचे शेअर्स आहेत. शरद पवार यांनी लवासातील अनेक बांधकामांना एफएसआय वाढवून दिला आहे.