बिग बॉस ७: अरमानची गर्लफ्रेंड घरात येणार?

By Prashant Jadhav | Last Updated: Thursday, November 28, 2013 - 13:47

www.24taas.com, झी मीडिया ब्युरो, गायत्री शंकर, मुंबई
बिग बॉसचा यंदाचा सिझन हा लव स्टोरी आणि मानसिक तणावाने ओतंबून वाहणारा आहे. तनिषा आणि अरमान हे एकमेकांना लाइक करायला लागले आहेत तर गोहर खान आणि कुशाल यांनी मान्य केले की ते एकमेकांसाठी स्पेशल आहेत.
सध्या एक चर्चा होत आहे की अरमान कोहली याची गर्लफ्रेंड तानिया सिंग ही बिग बॉसच्या घरात येऊ शकते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या डेली ड्राम्याचा डोस आता डबल होण्याची शक्यता आहे.
न्यूड योगा इंस्ट्रक्टर विवेक मिश्रा काही दिवसापूर्वी बिग बॉसच्या घरात आला होता आणि तो गेलाही... त्याने अरमानपासून दूरावलेल्या गर्लफ्रेंडबद्दल बोलले होते. विवेकने अरमानचे हे गुपीत उघड केल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या होत्या. तसेच अरमान आणि त्यांच्या गर्लफ्रेंडमध्ये प्रोब्लेम आहेत हे समोर आले होते.
या संदर्भात बाहेर येत असलेल्या बातम्यांनुसार शोचे निर्माते तनियाला शोमध्ये घेण्यास उत्सुक आहेत. ती जर या शो मध्ये आली तर तनिषाची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणे खुप मजेचे ठरणार आहे. अरमान तेव्हा परिस्थिती कशी सांभाळतो हे काळच ठरविणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 28, 2013 - 13:46
comments powered by Disqus