१५ ऑगस्टला पुन्हा `सत्यमेव जयते`

आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे छोट्य पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. हा कर्यक्रम १५ ऑगस्टला पुन्हा पाहायला मिळणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 12, 2012, 08:02 PM IST

www.24taas.com, मुंबई
आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे छोट्य पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. हा कर्यक्रम १५ ऑगस्टला पुन्हा पाहायला मिळणार आहे.
इतर कार्यक्रमांच्या तुलनेत या कार्यक्रमाची रुपरेखा, सादरीकरण आणि विषय अत्यंत वेगळे आणि महत्वाचे असल्यामुळे त्यांनी भारतीयांच्या मनात घर केलं. भारतीय समाजातील समस्यांवर आमिरने आपल्या खास शैलीत भाष्य केलं. ते सोडवण्यासाठी आमिर एक पाऊल पुढे आला. लोकांच्या मनात आमिरबद्दल विशेष स्थान निर्माण झालं. म्हणून १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र्य दिनाचं औचित्य साधत आमिर खान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाचं पहिलं पर्व नुकतंच संपलं. तरीही १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पुन्हा पेटवण्यासाठी आमिर खान सत्यमेव जयतेचा खास भाग सादर करणार आहे. ‘सत्यमेव जयते का सफर’ असं या कार्यक्रमाचं नाव असेल. हा कार्यक्रम म्हणजे आमिरच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असेल.