मॅड इन इंडियामध्ये दिसणार `अभि-अॅश`?

अगोदर गुत्थी बनून प्रेक्षकांकडून वाहवा लुटल्यानंतर आता कॉमेडीयन सुनील ग्रोवर आपल्या `मॅड इन इंडिया`मधून `चुटकी`च्या रुपात सगळ्यांना हसवाया प्रयत्न करतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 12, 2014, 03:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अगोदर गुत्थी बनून प्रेक्षकांकडून वाहवा लुटल्यानंतर आता कॉमेडीयन सुनील ग्रोवर आपल्या `मॅड इन इंडिया`मधून `चुटकी`च्या रुपात सगळ्यांना हसवाया प्रयत्न करतोय. या कार्यक्रमात लवकरच बॉलिवूडचं आदर्श जो़डपं समजलं जाणारे अभि-ऐश सहभागी होणार आहेत, अशी माहिती मिळतेय.
`मॅड इन इंडिया` या कार्यक्रमात एखाद्या सेलिब्रिटीला बोलावून त्याची मुलाखत घेतली जाते. याचसाठी प्रोडक्शन हाऊसनं आपल्या कार्यक्रमात येण्यासाठी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्याशी संपर्क साधलाय.
परंतु, अभि-ऐशकडून अद्याप कोणतंही उत्तर आलं नसल्याचं समजतंय. अभि-ऐशकडून हे उत्तर हो असेल तर `चुटकी` लवकरच तुम्हाला या स्टार जोडप्यासोबत दिसू शकेल.
आत्तापर्यंत या कार्यक्रमात बाबा रामदेव, गोविंदा, करिश्मा, शिल्पा, हरमन यांसारखे चर्चित चेहरे उपस्थित झालेले दिसले. या कार्यक्रमाला `झलक दिखला जा`फेम अँकर आणि अभिनेता मनीष पॉल होस्ट करताना दिसतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.