माजी क्रिकेटपटूंमध्ये रंगणार चँपियन लीग

पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मास्टर्स चँपियन लीगसाठी जगातील सर्वोत्कृष्ट १२ क्रिकेटपटूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. यातील सहा क्रिकेटपटू हे माजी आंतरराष्ट्रीय कर्णधार आहेत. 

Updated: Dec 4, 2015, 10:57 AM IST
माजी क्रिकेटपटूंमध्ये रंगणार चँपियन लीग title=

दुबई : पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मास्टर्स चँपियन लीगसाठी जगातील सर्वोत्कृष्ट १२ क्रिकेटपटूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. यातील सहा क्रिकेटपटू हे माजी आंतरराष्ट्रीय कर्णधार आहेत. 

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, ग्रॅमी स्मिथ आणि मायकेल वॉन यांचा समावेश आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही या लीगमध्ये खेळणार आहे.

स्पर्धेत समावेश कऱण्यात आलेल्यांमध्ये पाकिस्तानचे तीन, भारत, इंग्लंड आणि श्रीलंका यांचे प्रत्येकी दोन तसेच न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या एका क्रिकेटपटूची नावे आहेत. निवडण्यात आलेल्या सहा क्रिकेटपटूंना सहा संघांमध्ये विभागण्यात येईल. सात डिसेंबरपूर्वी या सर्व क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. 

हे आहेत १२ खेळाडू
सौरव गांगुली (भारत)
वीरेंद्र सेहवाग (भारत)
मायकेल वॉन (इंग्लंड)
ग्रीम स्मिथ (दक्षिण अफ्रीका)
कुमार संगकारा (श्रीलंका)
महेला जयवर्धने (श्रीलंका)
हीथ स्ट्रीक (झिंम्बाब्वे)
ग्रीम स्वान (इंग्लंड)
अब्दुल रझाक (पाकिस्तान)
अजहर महमूद (पाकिस्तान)
स्कॉट स्टायरिस (न्यूझीलंड)
शोएब अख्तर (पाकिस्तान)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.