टीम इंडियाने विजयाचे सोने लुटले, 3-0 ने कसोटी मालिका जिंकली

टीम इंडियाने न्यूझीलंडचा 321 धावांनी पराभव आज दसऱ्याचे सीमोल्लघंन करत विजयाचे सोने लुटले. तिसऱ्या कसोटी सामना 321 जिंकला आणि न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली. 

Updated: Oct 11, 2016, 05:15 PM IST
टीम इंडियाने विजयाचे सोने लुटले, 3-0 ने कसोटी मालिका जिंकली title=

इंदौर : टीम इंडियाने न्यूझीलंडचा 321 धावांनी पराभव आज दसऱ्याचे सीमोल्लघंन करत विजयाचे सोने लुटले. तिसऱ्या कसोटी सामना 321 जिंकला आणि न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली. 

या कसोटी विजयासह टीम इंडियाचे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान भक्कम झाले आहे. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन आणि जाडेजाच्या यांच्या चांगल्या खेळाच्या जोरावर हा सामना जिंकला.
 
ऑफस्पिनर रवीचंद्रन आश्विनने पुन्हा एकदा अचूक मारा करताना सामन्यात 13 बळी घेतले. भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आश्विननंतर जाडेजाने आपल्या फिरकीतील जादू दाखवली. जाडेजाने सामन्यात चार फलंदांजांना तंबूचा रस्ता दाखवला. 
 
दरम्यान, इंदौरच्या होळकर मैदानावर तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने केलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने 216 धावांवर 3 गडी बाद असताना डाव घोषित केला. डाव घोषित केला तेव्हा चेतेश्वर पुजारा 101 तर अजिंक्य रहाणे 23 धावांवर खेळत होते. गौतम गंभीरने 56 धावांत सहा चौकारांसह 50 धावांची खेळी केली. गंभीरचं कसोटी कारकीर्दीतलं हे 22वं अर्धशतक होते.