सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पहिल्यांदा बोलला नेहरा

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आशिष नेहरा आणि विराट कोहली यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत नेहरा एका कार्यक्रमात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला पुरस्कार देताना दिसतोय. नेहराच्या म्हणण्यानुसार विराट कोहलीमुळे हा फोटो व्हायरल झालाय. 

Updated: May 27, 2016, 11:27 AM IST
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पहिल्यांदा बोलला नेहरा title=

मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आशिष नेहरा आणि विराट कोहली यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत नेहरा एका कार्यक्रमात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला पुरस्कार देताना दिसतोय. नेहराच्या म्हणण्यानुसार विराट कोहलीमुळे हा फोटो व्हायरल झालाय. 

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार जेव्हा या व्हायरल फोटोबाबत नेहराला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाहीये. मात्र हा फोटो विराटमुळे व्हायरल झालाय. विराट कोहली ज्या स्थानावर आहे त्या स्थानामुळे हा फोटो प्रसिद्ध झालाय. नाहीतर एखाद्या भिंतीवर हा फोटो लटकलेला असता आणि कोणी त्याच्याबद्दल बोलले नसते.

विराट-नेहराचा हा फोटो १३ वर्षांपूर्वीचा आहे. २००९-११मध्ये विराटने खेळण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी इतकी दखल घेतली गेली नव्हती. 

आशिष नेहरा सध्या दुखापतीमुळे आयपीएलबाहेर आहे. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली होती. दुखापत होण्याआधी नेहराने आयपीएलच्या ८ सामन्यात ९ विकेट घेतल्या होत्या.