विक्रम रचूनही भारत हरला, ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट राखून विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच विकेट राखून विजय मिळवला. 

Updated: Jan 12, 2016, 05:00 PM IST
विक्रम रचूनही भारत हरला, ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट राखून विजय title=

पर्थ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच विकेट राखून विजय मिळवला. भारताने विजयासाठी ठेवलेले ३१० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने पाच विकेट राखून पूर्ण केले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या विजयात चमकला तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ. त्याच्या १४९ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचे हे आव्हान सहज परतवून लावले. 

 

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आणि तीन गड्यांच्या मोबदल्यात ३०९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताने रचलेली ही सर्वात मोठी धावसंख्या होती. यात रोहित शर्माचे मोठे योगदान होते. अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत त्याने १६३ चेंडूत नाबाद १७१ धावा कुटल्या. मात्र त्याची ही खेळी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. त्याला चांगली साथ दिली होती विराट कोहलीने. विराटने ९१ धावा करताना रोहितसोबत २००हून अधिक धावांची भागीदारी केली. 

पहिल्या सामन्यातील हे विक्रम

ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताची सर्वात मोठी धावसंख्या

ऑस्ट्रेलियात तिसऱ्यांदा शतक ठोकणारा रोहित शर्मा भारताचा दुसरा फलंदाज. यापूर्वी हा विक्रम व्ही.व्ही.एस लक्ष्मणच्या नावावर होता. 

पर्थवर शतक ठोकणारा रोहित ठरला पहिला भारतीय क्रिकेटर.

रोहितने ३७ वर्षांपूर्वीचा पर्थवर विवियन रिचर्ड यांचा १५३ धावांचा केलेला रेकॉर्ड तोडला आहे.

पदार्पणातच प्रतिस्पर्ध्यांच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करणारा बरिंदर सरण चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला

आशियाबाहेर आठ वेळा दोनशेहून अधिक धावांची भागीदारी रचण्यात भारतीय क्रिकेटपटूंना यश

 

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड